नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे आज मंगळवारी मोर्चासह आयोजित केलेली जाहीर सभा उस्फुर्त प्रतिसादात पार पडली.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आज आयोजित केलेल्या मोर्चाला धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ झाला सदर मोर्चामध्ये श्रीराम सेनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या वंदेमातरम सह देशभक्तीपर अन्य घोषणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जय जय कारा निघालेल्या या मोर्चामुळे परिसर दणाणून गेला होता. कॉलेज रोडमार्गे सरदार्स हायस्कूल मैदानावर या मोर्चाची सांगता झाली.
सरदार हायस्कूल मैदानावर भव्य व्यासपीठ उभारून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये प्रमुख वक्ते हुक्केरी मठाचे पूज्य श्री मंजुनाथ स्वामी यांच्यासह काही कायदे तज्ञांची समयोचित भाषणे झाली पूज्य श्री मंजुनाथ स्वामी आपल्या भाषणात नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारतातील मुस्लीम लोकांना आणि हिंदू लोकांना त्रास देण्यासाठी अमलात आणला जात असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत असे सांगितले. पाकिस्तान बांगलादेश व अफगानिस्तान मध्ये राहणाऱ्या आपल्या हिंदू जैन शीख व बौद्ध धर्माच्या लोकांना सामाजिक व धार्मिक जाचाला सामोरे जावे लागत आहे यापैकी बरेच नागरिक पुन्हा भारतात येऊन स्थायिक झालेले आहेत अशा 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळावे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा अंमलात आणण्याचा मुख्य उद्देश आहे भारतीय असणाऱ्या मुस्लिम बांधवांना हद्दपार करण्यासाठी हा कायदा झालेला नाही तथापि जे लोक देशाची एकता व अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मात्र आम्ही या कायद्याद्वारे देशातून हाकलून लावू असे स्वामीजींनी स्पष्ट केले.
सदर सभेला श्रीराम सेना आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती यामध्ये महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
*निवेदन सादर*
सभेच्या व्यासपीठावर नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी करण्याची त्वरित अंमलबजावणी केली जावी अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आले.
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या उपस्थितीत श्री मंजुनाथ स्वामी यांनी सादर केलेले निवेदन सहाय्यक जिल्हाधिकार्यांनी स्वीकारून त्वरित पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचा निर्णय तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद असून या कायद्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. मात्र या कायद्याची त्वरीत अंमलबजावणी केली जावी. त्याचप्रमाणे नागरिकांचे राष्ट्रीय नोंदणीकरण, लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड यांची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात दंगली पेटविणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध भादवि कलम 121, 121ए, 122, 123 आणि 124,ए अन्वये गुन्हे नोंदविण्याची सूचना आपण सर्व राज्यांना द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील देण्यात येणार आहे.