केंद्र सरकारकडून म्हादई प्रकरणी उत्तर कर्नाटकातील जनतेला गोड बातमी मिळण्याची अपेक्षा होती पण पुन्हा एकदा कर्नाटकच्या पदरी निराशा पडली आहे.पर्यावरण,वन आणि हवामान बदल खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकच्या जनतेची दिशाभूल करत असल्याबद्दल पत्र लिहिले आहे.
राजपत्रात म्हादइ पाणी वाटप लवादाचा आदेश प्रसिद्ध झाल्यावर आणि वन आणि वन्यजीव खात्याकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्यावर कळसा भांडुराच्या कामाला प्रारंभ करावा असे जावडेकर यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.आणि या दोन्ही परवानग्या केंद्राकडे प्रलंबित आहेत.
यापूर्वी गोव्याने म्हादइ प्रकरणी केंद्रावर दबाव आणल्यावर केंद्राने आपल्या भूमिकेत बदल केला आहे.सध्या कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांनी लवादाच्या निर्णया विरोधात दाद मागितली आहे.त्यामुळे कळसा भांडुरा योजनेचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर ठरणार आहे.