संपूर्ण राज्यभर गाजलेल्या आयएमए घोटाळ्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली असून वरिष्ठ आय पी एस पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी परवानगी मागितली आहे.वरिष्ठ आय पी एस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यावर खटला चालवण्यास सी बी आय ने परवानगी मागितल्यामुळे खळबळ उडाली आहे.
१९९८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर, आयजीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू आणि २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय हिल्लोरी, तत्कालीन डीसीपी पूर्व, बेंगलोर शहर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास सीबीआयने परवानगी मागितली आहे.
बेंगळूर येथील कोट्यवधींच्या आयएमए घोटाळ्याचा तपास हेमंत निंबाळकर हिल्लोरी यांच्यासह ईबी श्रीधारा, तत्कालीन उप-उप. एसपी, सीआयडी, ईओडब्ल्यू, एम. रमेश, निरीक्षक आणि तत्कालीन एसएचओ कमर्शियल स्ट्रीट पोलिस स्टेशन, बंगलोर शहर, पी. गौरीशंकर, तत्कालीन उपनिरीक्षक, बेंगळुरू शहर आणि श्री. एल.सी. नागराज, तत्कालीन सहाय्यक आयुक्त, बेंगळुरू उत्तर उपविभाग यांनी तपास केला होता.
कोट्यवधींच्या घोटाळ्या प्रकरणी या अधिकाऱ्यांनी तपास केला होता.या प्रकरणी क्लीन चिट दिल्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता.त्यामुळे .नंतर हे प्रकरण सी बी आय कडे देण्यात आला होता.सीबीआय ने याची सखोल चौकशी करून या अधिकाऱ्यावर खटला चालविण्यास अनुमती मागितली आहे.