Saturday, January 4, 2025

/

सुनील शेट्टीची बेळगावला भेट

 belgaum

बेळगाव आणि परिसराचे आकर्षण अनेक सेलिब्रिटीना आहे.त्यामुळे विविध कारणाने या व्यक्ती बेळगाव आणि परिसराला भेट देऊन वास्तव्य करतात.याला अपवाद अभिनेते देखील नाहीत.रविवारी हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टी याने बेळगाव जवळील बेळगुंदी येथे भेट देऊन एक दिवस मुक्कामही केला होता.

Sunil shetty
Bollywood actor Sunil shetty visited belgaum

बेळगुंदी, राकस्कोप, म्हाळुंगे आणि जाम्बोटी भागालाही सुनील शेट्टीने भेट दिली.सुनील शेट्टी हे मूळचे हॉटेल व्यावसायिक असून त्यांनी फिटनेस सेंटर देखील सुरू केली आहेत.सुनील शेट्टी हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने त्यांनी राकसकोप येथील शिव मंदिराला भेट देऊन पूजाही केली.

शेट्टी यांचे बेळगाव भेटी दरम्यान तेंडोलकर यांच्या बेळगुंदी येथील फार्म हाऊसमध्ये वास्तव्य होते.हा दौरा पूर्णपणे खासगी होता.सुनील शेट्टी यांचा बेळगाव परिसरात हॉटेल,रिसॉर्ट आणि फिटनेस सेंटर सुरू करण्याचा विचार आहे.त्यामुळेच त्यांनी बेळगाव परिसराला भेट देऊन पाहणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.