देशाच्या नागरी उड्डाण खात्याच्या डायरेक्टर जनरलनी परवानगी दिल्यामुळे स्टार एअर कंपनीतर्फे हिवाळी मोसमासाठी येत्या 20 जानेवारी 2020 पासून बेळगाव ते इंदोर अशी थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
बेळगाव ते देवी अहील्या होळकर एअरपोर्ट इंदोर या विमान प्रवासाच्या आरक्षणासाठी दर सोमवार, मंगळवार व गुरुवारी स्टार एअरच्या वेबसाईट फ्रिक्वेन्सी:3 वर सेवा उपलब्ध असणार आहे.
बेळगाव ते इंदोर विमान विमानाचे प्रवास शुल्क 3599 रुपये इतके आहे. सदर विमानसेवेचे येत्या 20 जानेवारीपासूनचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. ओजी-121. आयएक्सजी- आयडीआर: दुपारी 1.10 वा. प्रस्थान/14.40 वा. आगमन, ओजी- 122. आयडीआर- आयएक्सजी: दुपारी 15.10 वा. प्रस्थान/16.45 वा. आगमन.
दरम्यान स्टार एअरच्या इंदोर ते किशनगड (अजमेर) या विमानसेवेला देखील परवानगी मिळाली आहे. ही बेळगावचीच विमानसेवा असून जी इंदोर मार्गे किशनघर (अजमेरला) जाईल आणि तेथून परत येईल. त्यामुळे बेळगाव होऊन इंदूरला नाहीतर किशनगड(अजमेर)- अजमेरला जाणाऱ्या प्रवाशांचीही चांगली सोय होणार आहे. मात्र इंदोर ते किशनगड मार्गावरील विमान सेवा केंव्हा कार्यरत होणार हे अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान उडान 3 ट्रूजेटने आपल्या 13 मार्गावरील विमान सेवेपैकी चार मार्गावरील विमानसेवा येत्या 2020 या नववर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.