भारतातील प्रत्येक शहरांमध्ये अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वातावरण शहरी असले तरी नियोजनात्मक धोरणाच्या अभावामुळे ते गलिच्छ असते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. स्वच्छता आणि वीज यांच्यासमोरील वाढून ठेवलेल्या समस्या असतात. यामुळेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा देण्यासाठी मोठ्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या. मात्र त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे बेळगावकर यांच्या पदरी निराशाच आली आहे.
स्मार्ट सिटीमध्ये पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जाणार आहे, अशी समजूत स्मार्ट सिटीच्या योजनेतून अनेक नागरिकांची करण्यात आली. मात्र ती योग्य प्रकारे आणि नियोजन बदलत्या नसल्याने बेळगाव करातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटी मधून पुरेसा पाणीसाठा कधीही भारनियमनाचा फटका न बसता मिळणारी वीज घनकचरा सहित समोर कचऱ्याचे व्यवस्थापन शहरीकरणाला साजेसे वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांना माफक दरात घरे गोरगरिबांना घरे माहिती व तंत्रज्ञानाची तसेच डिजिटलायझेशन नाते उत्तम प्रशासन आणि विशेष म्हणजे गव्हर्नरसंसवर भर पोषक वातावरण महिला मुले व वृद्ध नागरिकांचे संरक्षण आणि आरोग्य व शिक्षणाची पुरेशी सोय यामध्ये मिळणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही.
अनेक सेवा सुविधा या स्मार्ट सिटीच्या योजनेतून बेळगावकरांना मिळणार या असेच बेळगावकर होते. मात्र तशी कोणतीच सुविधा अजून पर्यंत तरी मिळालेली नाही. त्यामुळे सिटीचा कारभार नेमका कुणासाठी असा संशय निर्माण होत आहे. ठेकेदार आणि कंत्राटदारांच्या हव्यासाला बेळगावकर बळी पडले आहेत. पैसे खाण्यातच अनेक अधिकारी आणि कंत्राटदार धन्यता मानू लागले आहेत. त्यामुळे माणसे तिचा गाजावाजा करून नागरिकांची दिशाभूल करण्यात मोठी धन्यता मानणाऱ्या स्मार्ट सिटीच्या योजनेतील अधिकाऱ्यांनी आता तरी शहाणे व्हावे व नागरिकांना सोय करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्मार्ट सिटी मधील स्मार्ट सोल्युशनमध्ये गव्हर्नर आणि नागरी सेवा कचऱ्याचे व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन ऊर्जेचे व्यवस्थापन आणि रस्ते वाहतूक पार्किंग आधीची मोबिलिटी आदींचा समावेश या स्मार्ट शेतीत होणार होता. मात्र रस्ते आणि गटारीत अजून पूर्ण करण्यात अपयश आलेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करून पैसे खाण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे स्मार्ट तिचा गाजावाजा कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.