बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या अविनाश कमण्णावर, तनवी मोहिते आणि भक्ती हिंडलेकर या स्केटिंगपटूची विशाखापट्टण येथे सुरू असलेल्या 57 व्या स्पीड नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2019 या स्पर्धेसाठी कर्नाटक संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 15 ते 25 डिसेंबर 2019 या कालावधीत विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे 57व्या स्पीड नॅशनल रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले उपरोक्त स्केटिंगपटूू प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर, योगेश कुलकर्णी आणि विशाल वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्केटिंग रिंक आणि केएलई सोसायटीचे स्केटिंग रिंक लींगराज कॉलेज येथे स्केटिंग चा सराव करतात.
अविनाश कमण्णावर, तनवी मोहिते आणि भक्ती हिंडलेकर या तीनही जलतरणपटूंना माजी आमदार श्याम घाडगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस पी.के. भारतकुमार कुमार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी प्रसाद तेंडुलकर आणि पालकवर्गाचे प्रोत्साहन लागत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील निवडीबद्दल उपरोक्त स्केटिंग पटूचेे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.