विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या 57 व्या राष्ट्रीय स्पीड रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचा स्केटिंगपटू अविनाश कमण्णावर याने कांस्य पदकाची कमाई केली.
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् तिथे येथे गेल्या 15 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत 57 व्या राष्ट्रीय स्पीड रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 स्केटर्सनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटिंगपटू मास्टर अविनाश कमण्णावर याने रिंक रेस प्रकारात तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले.
अविनाश कमण्णावर (वय 7 वर्षे) हा बेळगावातील गुड शेफर्ड सेन्ट्रल स्कूलचा विद्यार्थी आहे. तो गेल्या चार वर्षापासून केएलई सोसायटीच्या लिंगराज कॉलेज स्केटिंग रिंग आणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग रिंक येथे स्केटिंगचा सराव करतो.
अविनाश कमण्णावर याला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर योगेश कुलकर्णी आणि विशाल व्यसने यांचे मार्गदर्शन तसेच केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, माजी आमदार शाम घाडगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस पीे.के.भारतकुमार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि त्याच्या पालकांचे प्रोत्साहन मिळत आहे