गोकाक पोटनिवडणुकीत तब्बल 29 हजार मतांच्या फरकांनी निवडून आलेले रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघ आपल्या रडार वर असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.काँग्रेस, जे डी एस मैत्री सरकार उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात सिंहाचा वाटा रमेश जारकीहोळी यांनी फार मोठी रिस्क घेऊन उचलला होता.रमेश यांच्यामुळेच येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार कर्नाटकात सत्तेवर आले.त्यामुळे सत्तांतर घडवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या रमेश जारकीहोळी यांना येडीयुरप्पा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद नक्कीच मिळणार आहे.इतकेच काय तर त्यांचे नशीब जोरावर असेल तर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची देखील लॉटरी लागू शकते . भाजपसाठी नव्या दमाने काम करण्याचा संदेशही रमेश यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या पतनाला लक्ष्मी हेब्बाळकर जबाबदार आहेत अशी टीका त्यांनी निवडणूक निकाला नंतर केली असून भविष्यात आपले लक्ष बेळगाव ग्रामीण मतदार संघाकडे असेल असा इशाराही दिला आहे.ग्रामीण मतदारसंघात अनेक बेकायदेशीर कृत्य चालली आहेत लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांनी अनेक क्लब अनेक गैर व्यवहार सुरू केलेत असा आरोप त्यांनी केला.
ग्रामीण मतदारसंघात कोणकोणती बेकायदेशीर कामे चालली आहेत त्यांची माहिती घेऊन यावर कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.मराठ्यांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे एक लाखां पैकी 50 हजार मते मराठ्यांच्या त्याना पडली होती भविष्यात मराठा समाजातील चांगल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन सर्वजण मिळून निवडून आणू असेही त्यांनी नमूद केलं.
पोट निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर आज पासूनच ग्रामीण मतदार संघाकडे लक्ष देणार असून पुढील निवडणुकीत हेब्बाळकर यांना धडा शिकवतो असेही त्यांनी कानडी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखातीत म्हटलं आहे.रमेश जारकीहोळी यांनी पोटनिवडणुक जिंकताच ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
आगामी निवडणुकीत भाजपकडून मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी दिल्यास माजी आमदार संजय पाटील यांची राजकीय कारकीर्द काय होणार?भाजपकडून मराठा समिती कडून मराठा असे दोघे स्पर्धेत राहिल्यास कुणाचा फायदा?या सर्व गोष्टीवर आता पासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत.,रमेश यांनी लक्ष्मी यांना थेट आवाहन दिल्यामुळे ग्रामीण भागातील कुकरची शिटी पुढील निवडणुकीत वाजणार की नाही याची चर्चां सुरु झाली आहे.