बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर उतरला असून आता कांदा प्रतिकिलो 100 रुपये इतका झाला आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर घसरला. गेल्या आठवड्यात एक नंबर कांद्याचा दर प्रति किलो 170 रुपये होता. त्याचप्रमाणे दोन नंबर आणि तीन नंबर कांद्याची अनुक्रमे 130 आणि 110 रुपये प्रतिकिलो अशा दराने विक्री होत होती.
मात्र आज बुधवारी एपीएमसीमध्ये महाराष्ट्रातून कांद्याची आवक झाल्याने कांद्याचा दर उतरला आहे. आता या ठिकाणी एक नंबर कांद्याची प्रति किलो 100 रुपये म्हणजे प्रतिक्विंटल 1 हजार रुपये प्रमाणे विक्री होत आहे. त्याप्रमाणे दोन नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो 80 रुपये आणि तीन नंबर कांद्याचा दर प्रति किलो 60 रुपये इतका झाला आहे.
यावेळी आवक झालेला कांदा लहान आकाराचा असून त्याचा दर्जाही तितकासा चांगला नसल्याचे बाजारपेठेतील जाणकारांनी सांगितले. दरम्यान गेल्या आठवड्यात एपीएमसी मार्केट यार्डातील कांद्याचा दर गगनाला भिडला होता. मागील आठवड्यात सोमवारी तर कांद्याचा दर प्रति किलो 170 रुपये म्हणजे 17 हजार रुपये क्विंटल इतका उच्चांकी झाला होता.
त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळाले होते तथापी आता कांद्याचा दर उतरल्याने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.