बेळगाव सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा व समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करा अशी मागण्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.मुख्यमंत्र्या सह अनेक नेत्याकडे पत्र लिहून सदर मागणी करण्यात आली आहे.
कालच राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अभिभाषणात बेळगावातील मराठी जनतेला न्याय प्रयत्न करू असा उल्लेख केला होता त्यामुळे नवीन सरकारने सीमा वासीयांना प्राधान्य दिले होते त्याला अनुसरून मध्यवर्ती समितीने मुख्यमंत्र्या सह इतर मंत्री व नेत्यांना पत्र लिहून उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा अशी मागणी केली आहे.
समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह मंत्री जयंत पाटील छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना पत्रे पाठवली आहेत.
नवीन सरकार अस्तिवात आल्या नंतर उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी यासाठी नवीन उच्चाधिकार समिती नियुक्त करा या शिवाय दिल्लीतील सुप्रीम कोर्टाचे वकील आणि बेळगावातील विविध समस्यां सोडवण्यासाठी नवीन समन्वयक मंत्री नियुक्त करा याशिवाय दिल्लीतील जेष्ठ विधी तज्ञ व वकिलांचे पॅनेलची बैठक घेऊन लवकर सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सीमा खटल्याला गती येण्यासाठी महाराष्ट्राच्या अडव्होकेट जरनल चा सहभाग दाव्याच्या कामकाजात सहभाग असावा अश्या मागण्या केल्या आहेत.
नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन देखील समितीने केले आहे.अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींनी पत्रावर सह्या केल्या आहेत.