मुंबईत सीमा प्रश्नी झालेल्या बैठकीचे पडसाद मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकी बाबत दोन्ही गटातील नेत्यांना केलेल्या सुचनेचे पडसाद बैठकीत पहायला मिळाले.
मध्यवर्ती समिती कोर्टाचे कामकाज बघेल तर इतरांनी व सर्वांनी मिळून मराठी विरोधातला बेळगावातील कर्नाटक विरोधी लढा तीव्र करावा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना ‘पुढील बैठकीत एक होऊन या’ अश्या सूचना केल्या बद्दल पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नाचा खटला 2004 साली दाखल केल्या पासून दिल्लीतील वकील,महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वय राखला आहे या शिवाय कोर्टाशी संबंधित कागदपत्रे पूर्तता करणे साक्षीदार नियुक्त करणे बैठका सहभाग घेणे समन्वय राखला आहे.यापुढेही मध्यवर्ती समिती कोर्टाचे कामकाज पाहत राहील. मुंबईत बैठकीला आलेल्या इतरांनी सीमा भागातील मराठी माणसावर होत असलेल्या अत्त्याचारा विरोधात काम करावं. सर्वजण मिळून रस्त्यावरची लढाई लढावी. पुढील मुंबईतील बैठकीस एकी करून या असे सुचना केलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीला दोन्ही घटकांना बोलावलं तसं बैठकीला हजर राहू असेही पत्रात नमूद करणार असल्याचे मध्यवर्ती समितीने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी तर एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्रीपदी निवड झाल्यामूळे व शरद पवार यांच्या जन्म दिनानिमित्त सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.सुरुवातीला माजी आमदार नारायणराव तरळे यांच्या सह निधन झालेल्या समिती कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजलीचा देखील ठराव संमत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी होते.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील आढावा अध्यक्ष दीपक दळवी, मनोहर किणेकर यांनी दिला त्यावर काहींनी सर्व सदस्यांना बैठकीला का बोलावलं असा प्रति प्रश्न केला असता सुरुवातीला आढावा बैठक अशी माहिती मिळाली त्या नंतर मुख्य बैठक असल्याचे समजले त्यामुळे सर्वांना माहिती देता आली नसल्याचे स्पष्ट केलं.