Thursday, December 26, 2024

/

मलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश

 belgaum

मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या गोशिन रु संस्थेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.

सदर स्पर्धेतील 50 ते 55 किलो वजनी गटात गोशिन रु संस्थेच्या आकाश पाटील याने 5 राऊंड जिंकून रौप्यपदक मिळविले. 55 ते 60 किलो वजनी गटात प्रसाद पाटीलने 4 राऊंड जिंकून चषक पटकाविला. 12 वर्षांखालील गटात निखील वनूर याने 4 राऊंड जिंकून कांस्यपदक पटकाविले. या यशस्वी कराटेपटूंना सिहांन चौसी काँग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे भारताचे सिहांन मधू पाटील यांना कराटे पंचांच्या चर्चासत्रामध्ये मलेशिया एकेएफचे तसेच डब्ल्यूएसएफचे चेअरमन ग्रँडमास्टर कॅलमेंट्स यांनी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले.

Karate
Karate

मलेशियातील कराटे स्पर्धेत भारत, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया आदी देशातील सुमारे 1600 कराटेपटूंनी भाग घेतला होता.

बेळगावच्या विजेत्या कराटेपटूंना प्रशिक्षक मधू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मधू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचा सराव करणाऱे कराटेपटू देश-विदेशात उत्कृष्ट कामगिरी करून लौकिक मिळवत असल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.