बेळगाव ए पी एम सी मार्केट यार्डात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवारी 170 रु.प्रति किलो म्हणजे 17 हजार क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली.बेळगाव शहराच्या इतिहासात बुधवारचा दर सर्वात उचांक्की ठरला आहे.
गेल्या महिन्या भरा पासून कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे सुरुवातीला 15 रु प्रति किलो असलेला कांदा 35 रु. 70,रु,90रु, 100 रु.130रु.आज 150 रु चा टप्पा पार करून 170 रु. वर पोहोचला आहे.बुधवारी एक नंबर कांदा 170 रु.किलो दोन नंबर कांदा 130 तर तीन नंबर कांद्याचा दर 110 पर्यंत पोहोचला आहे.
कर्नाटकातील कांद्याचा मोसम संपला आहे तर अर्धा कांदा अति वृष्टी मुळे खराब झाला आहे त्यामुळे बेळगाव ए पी एम सी मार्केट मध्ये कर्नाटक कांद्याची आवक कमी झाली आजच्या कांद्याचा सिजन संपला आहे. तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीमुळे कांदा खराब झाला आहे ही कांद्याचा दर गगनाला भिडण्याची मुख्य कारणे आहेत.
बुधवारी कांद्याची बेळगाव ए पी एम सी मार्केट मध्ये केवळ 30 गाड्या पर्यंत होती त्यामुळे खरेदीदार अधिक कांदा कमी त्यामुळे देखील दर वाढले आहेत. दर स्थिर राहण्यासाठी शनिवारी आणि बुधवारी बेळगावच्या मार्केट यार्डात कमीतकमी 200 गाड्यांची गरज असते मात्र आजच्या घडीला केवळ30 गाड्या आवक असल्याने मागणी अधिक व पुरवठा कमी झाला आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला कांद्याने रडवल आहे.