एअरटेल नेटवर्क आज बंद झाल्यामुळे एअरटेल मोबाईल धारकांची आज चांगलीच गोची झाली.अलीकडे मोबाईल म्हणजे प्रत्येक व्यक्तीची लाईफ्लाईन बनली आहे.मोबाईलला रेंज नसेल तर मोबाईल धारक अस्वस्थ होतो.
एअरटेल नेटवर्क बंद पडल्यामुळे त्या कंपनीच्या मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागला.मोबाईलवरून कामानिमित्त संपर्क साधणे देखील दुरापास्त झाल्यामुळे गोवावेस येथील एअरटेल कार्यालयात मोबाईल ग्राहकांनी आपल्या तक्रारी करण्यासाठी गर्दी केली होती.
मोबाईल ग्राहकांच्या गर्दीमुळे तेथील कर्मचाऱ्यांना त्यांना उत्तर देताना नाकेनऊ झाले.अलीकडे सगळ्या बाबतीत मनुष्य मोबाईलवर अवलंबून राहू लागला आहे.माणूस मोबाईलचा गुलाम बनला आहे.मोबाईल फार वेळ वाजला नाही,व्हाट्सअप वर मेसेज आला नाही तर माणूस अस्वस्थ होतो.
पण नेटवर्क फेल्युअर झाले की माणसाची पाण्याबाहेर काढलेल्या माशासरखी अवस्था होते हे एअरटेल नेटवर्क बंद असल्यामुळे अनुभवायला मिळाले आहे.