आम्ही आमच्या कामात आहोत ते करतच असतो मात्र मराठी कानडी न करता बेळगावात सर्वांनी एकत्र येऊन कलेसाठी काम करा असा सल्ला मराठी सिने अभिनेते जितेंद्र जोशी यांनी दिला आहे.
शनिवारी चौथ्या आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन आयनॉकस मध्ये झालं मराठी सिनेअभिनेता जितेंद्र जोशी यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी दिग्दर्शक संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले आज आयोजित केलेले फिल्म फेस्टिव्हल बेळगाव साठी महत्वाचे आहेत.प्रादेशिक अस्मिता,भाषा आम्ही जपत असतो बोलत असतो असे लघुपट महोत्सव संस्कृतीची जाणीव आहे.ही जाणीव वाढवण्यासाठी तुम्हाला एकीने हातात हात मिळवून काम करण्याची गरज आहे.तुम्हीच याचे आधार बनवून हात बळकट करावे लागणार आहेत.
लघु फिल्म फेस्टिव्हल किती मोठा होईल, तुम्हाला किती याच्या खोल वर जायला मिळेल याचा अभ्यास करा आणि सर्वजण एकत्र असे ते म्हणाले.शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल काय असतो याला किती खर्च असेल यातून परत पैसे कसे मिळवता येतात याची जाणीव बेळगावकरांना यायला हवी. आयोजक अगदी रंग मंच टिकवण्यासाठी उत्साही पणे हे काम करताहेत हा उत्साह अजून वाढवायला पाहिजे असेही त्यांनी नमूद केलं.
दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 180 लघु चित्रपटातून 58 लघु चित्रपटांची निवड करण्यात आली आहे मराठी,इंग्रजी,हिंदी,जर्मन,स्पॅनिश,श्री लंकन,कन्नड,इटालियन चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहेत.उद्या रविवारी सांगता होणार आहे.