Tuesday, January 28, 2025

/

पुंडलिक प्रकरणाची विशेष अधिकाऱ्यांकडून चौकशी

 belgaum

बेळगावचे शिक्षण खात्याचे उप संचालक ए.बी.पुंडलिक यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी बंगलोर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे सचिव उमाशंकर यांची भेट घेऊन केली आहे.या संबंधीचे निवेदन आणि कागदपत्रेही गोरल यांनी उमाशंकर यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

पुंडलिक हे गेल्या दहा बारा वर्षापासून बेळगाव जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.कार्यालयातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे.निकृष्ट दर्जाच्या सायकली विद्यार्थ्यांना वितरित करणे,कार्यालय साहित्यात गैरकारभार असे अनेक तक्रारी त्यांच्या विरुद्ध आहेत.जिल्हा पंचायतीच्या बैठकीत 62 सदस्यांनी त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांची बदली करावी अशी मागणी जिल्हा पंचायत सी इ ओ कडे केली आहे.

पुंडलिक हे भ्रष्टाचार प्रकरणी दोषी आहेत चौकशीचा अहवाल धारवाडच्या शिक्षण आयुक्तांकडे पाठवला आहे.पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने संशय येतो.जिल्हा पंचायत सदस्य देखील काय कारवाई पुंडलिक यांच्यावर करण्यात आली म्हणून विचारत आहेत.तरी आपण उच्च अधिकारी नेमून पुंडलिक यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी.

 belgaum
Ramesh goral
Ramesh goral

त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जिल्हा पंचायत सदस्य आणि नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत असे रमेश गोरल यांनी उमाशंकर याना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

विशेष अधिकारी करणार चौकशी

निवेदनाचा स्वीकार करत उमा शंकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून सदर अधिकारी बेळगावाला येऊन चौकशी करून शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे.

बेळगावातील एका आमदारा कडून वारंवार पुंडलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप रमेश गोरल यांनी केला असून मात्र आता शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे त्यामुळे भ्रष्ट्र अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.