येळ्ळूर येथे ग्राम पंचायत कार्यालया जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर तलावाच्या काठावर दारू पिणाऱ्यांचा हैदोस सुरू झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका सहन करावा लागला आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तलावाच्या बाजूनी सर्व दारूच्या बॉटल, पाकीट सर्वत्र पडून दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे येथे जाणेही अवघड बनले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी आपला कारभार सुरू करतात हा कारभार मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. रात्री दंगामस्ती करून अनेकांची झोप उडविण्यात धन्यता मान्यता येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
परिसरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वाकर्सने जाणाऱ्या महिलांना त्याचा त्रास होत आहे. सकाळ सकाळी या बाटल्यांचे दर्शन घेऊन मॉर्निंग करून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे याकडे कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वारंवार तक्रार करूनही याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. तेव्हा तातडीने तळीराम आवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वेळोवेळी वार्ड सदस्यना सांगून सुद्धा आज पर्यंत कोणतीही कारवाही झाली नाही. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीला सांगूनही अशा अवैद्य कारभाराला आळा घालण्याऐवजी याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना त्रास देण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. त्यामुळे अशा तळीराम आवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
.आमची समस्या जर दूर केली नाही तर पंचायत वर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे असे सांगण्यात येत आहे.