म्हैस धुतेवेळी पाय घसरल्याने चाळीस फूट खोल पाणी असलेल्या कवारीच्या खाणीत पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.अलतगा येथील खडीच्या खाणीत रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे.
रूपा रुपेश चौगुले वय 30 असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार रूपा या म्हशी धुण्यासाठी सायंकाळी क्वारी कडे गेल्या होत्या त्यांच्या सोबत दहा आणि बारा वयाची त्यांची दोन मुलं देखील होती. खाणीत म्हैस धुतेवेळी त्यांचा पाय घसरला असावा त्यानंतर त्या 40 फूट खोल खडीच्या खाणीत पडल्या असाव्यात अशी माहिती मिळाली आहे.
रूपा पाण्यात पडल्या वर सोबत असलेल्या तिच्या मुलांनी काठी देऊन बुडताना आपल्या आईला वाचण्याचा प्रयत्न केला मात्र चिमुरड्यांचे प्रयत्न अपुरे पडले. स्वतःची आई बुडताना पाहिलेली मुलांनी आरडाओरडा केली व स्वतःच्या वडीलांना देखील फोन करून आई बुडल्याची माहिती दिली. सदर घटना कळताच अलतगा भागातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
दिवसभर भात कापणी करून सायंकाळीच्या सत्रात रूपा या चार म्हशी घेऊन धुण्यासाठी क्वारी कडे गेल्या होत्या.
काकती पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.ग्रामस्थांकडूनच उशिरा सायंकाळी मृतदेह क्वारी बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर अलतगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.