काँग्रेसच्या वाटेवर असलेले कागवडचे माजी भाजप आमदार राजू कागे यांना भाजप सोडू नका म्हणून सांगण्यास गेलेल्या उमेश कत्ती यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.
आमदार उमेश कत्ती यांनी राजू कागे यांची भेट घेऊन भाजप सोडू नका अशी विनंती केली पण राजू कागे हे काँग्रेसमधे जाण्यावर ठाम राहिले आहेत. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेऊन त्यांना तिकीट देण्यासंबंधी बोलूया असेही कत्ती यांनी सांगितले.
राजू कागे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कागे हे आपले मित्र आहेत.आठवड्यातून तीन चार वेळा आमची भेट होते.त्याप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो होतो.यावेळी बोलताना भाजप सोडू नका असे मी त्यांना सांगितले पण त्यांनी त्याला नकार दिल्याने कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उमेश कत्ती यांना भाजप मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अगोदर ते नाराज आहेत मात्र त्यांनी काँग्रेस मध्ये गेलेल्या राजू कागे यांची मनधरणी करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न असफल झाला आहे.