स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.अनेक ठिकाणी कामे संथगतीने सुरू आहेत तर काही ठिकाणी व्यवस्थित सुरू आहेत.पण या विकासकामामुळे निसर्गाला बाधा पोचणार नाही याची काळजी घेतली जाते काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्हॅकसीन डेपोमध्ये सध्या वाकिंग ट्रॅकचे काम सुरू आहे .वाकिंग ट्रॅक तयार करण्यासाठी तेथे झाडांची कत्तल केली जात आहे.झाडांची कत्तल करून वाकिंग ट्रॅक कशाला हवा असा सवाल तेथे फिरायला जाणारे आणि पर्यावरण वादी विचारत आहेत.
एका झाडालाही धक्का न लावता विकासकामे करण्यात येतील असे सांगून कामे सुरू केली आहेत.त्यामुळे बेळगावचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे व्हॅक्ससिन डेपो ची ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे.डेपोमध्ये जैवविविधता असून त्याचा ऱ्हास होण्याची शक्यताही पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.झाडांची कत्तल करून विकास आम्हाला नको अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात भ्रष्टाचार निर्मुलन परिवार या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वॅक्सिन डेपो मधील झाडांची कत्तल थांबवा वन्य जीवींचे रक्षण करा अशी मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा देखील आरोप होत आहे.
बेळगाव शहराला कॅटोंमेंट परिसर आणि वॅक्सिंन डेपो हे दोन परिसर ऑक्सिजन पुरवत असतात मिलिटरीच्या ताब्यात असल्याने कॅटोंमेंट परिसराला वनराई सुरक्षित आहे मात्र व्हॅकसीन डेपो वर असलेल्या वन राई वर मात्र घाला होत आहे.