वाहतूक शाखेच्या एसीपीला एका वाहन चालकाने श्रीमुखात लगावल्याची घटना कित्तूर चन्नमा चौकात घडली आहे.
नेहमीप्रमाणे वाहने थांबवून कागदपत्रांची तपासणी वाहतूक पोलीस आणि अधिक्कारी करत होते.यावेळी एक कार थांबविण्यात आली.नंतर वाहन चालक किरण बाळू राठोड आणि वाहतूक एसीपी आर आर कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाला.नंतर राठोड याने थेट एसीपीच्या श्रीमुखात लगावली.
उपस्थित पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात त्याने स्वतःच्या वाहनातून पोलीस स्टेशन गाठले.चन्नमा चौकात झालेल्या घटनेने काही काळ तेथे गोंधळ उडाला होता.