बेळगावगाव,कारवार,निपाणी,बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी मराठी भाषिकांनी शहर दणाणून सोडले. पुन्हा एकदा बेळगावातील रस्त्यावर विराट अश्या मराठी अस्मितेच दर्शन घडलं.
सकाळी साडेनऊ वाजता निघालेल्या सायकल फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते.दंडाला काळ्या फिती,हातात भगवे ध्वज,डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले होते.हातात विविध फलक देखील सायकल फेरीत सहभागी झालेल्यानी घेतले होते.
सीमालढ्यासाठी एकत्र या,माझे बाबा समिती मी समिती असा फलक हातात धरलेल्या लहान मुलाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.समितीतील दोन गटांना एकत्र या असे आवाहन करणारा बॅनर नार्वेकर गल्लीतील तरुणांनी फेरीत प्रदर्शित केला होता. गोवावेस रामलिंग वाडी येथील युवकांनी आले किती गेले किती फक्त महाराष्ट्र एकीकरण समिती असा राष्ट्रीय पक्षावर टीका करणाऱ्या फलक देखील लक्षवेधी ठरला होता.चव्हाट गल्लीतील हिंदुत्व आमची आई मराठी आमची बहीण आई बहिणीवर अत्त्याचार सुरू असताना आम्ही गप्प बसणार नाही असा फलक घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आमचं ठरलंय….
बेळगावी नव्हे बेळगावचं .आमचं ठरलंय आणि बेळगाव उरलंय अश्या उत्साही घोषणा देत युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सायकल फेरी दणाणून सोडली या अगोदर संभाजी उद्यानात येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला होता.सायकल फेरीच्या सुरुवातीला युवकांची संख्या कमी होती मात्र फेरी कपिलेश्वर उड्डाण पुलकडे येताच हजारो युवक महिला कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.
बेळगावसाठी चंदगडमधील सर्वपक्षीय युवकांचे आंदोलन.
जर सीमा भागातील कोणत्याही मराठी भाषिक नागरिकला त्रास दयाल तर बेळगावात संपूर्ण चंदगड घेऊन घूसु असा इशारा देण्यात आला.काळा दिन पाळणाऱ्या सीमा भागातील मराठी भाषिक लोकांना न्याय मिळावा म्हणून चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय तरुण काळ्या फिटी बांधून रस्त्यावर उतरले होते. मुंबईत सीमा संघर्ष समितीच्या वतीने निदर्शन करण्यात आली यावेळी युवकांनी कर्नाटक व केंद्र सरकारचा निषेध केला. निपाणी व खानापूर समितीच्या वतीने देखील निषेध फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.