शाहूनगर येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाच लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आले आहेत. रविवारी ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी आठ या वेळेत चोरीचा प्रकार घडला आहे. मातोश्री कॉलनी संगम गल्ली शाहूनगर येथे सौम्या अप्पाजी पासपगोल यांनी एपीएमसी स्थानकात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे.
सौम्याचे कुटुंबीय देवदर्शनासाठी तुमकुरला गेले होते हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा इंटरलॉक तोडून आत प्रवेश केला आहे. लाकडी कपाट फोडून कपाटातील सुमारे 180 ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने त्यांनी पळविले आहेत. तर पंचवीस हजार रोख रक्कमही लांबविले आहे.
शनिवारी रात्री चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. त्यानंतर चोरीची घटना उघडकीस येताच एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ठसे तज्ञांची मदत घेतली चोरीचे या घटनेनंतर पुन्हा त्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.