सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेला 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय उचलून धरला आहे.पण अपात्र आमदारांना निवडणूक लढविण्यास अनुमती दिली आहे.
अपात्र आमदारांवर बंदी किती काळ घालायचा अधिकार मात्र सभापतींना नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.त्यामुळे अपात्र आमदारांची अवस्था थोडी खुशी,थोडा गम अशी झाली आहे.
तत्कालीन विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली होती अपात्र ठरवले होते त्या विरोधात अपात्र या आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर आज निर्णय देण्यात आला.
या निर्णयामुळे बेळगावातील गोकाक विधानसभा मतदारसंघात रमेश जारकीहोळी,कागवाड मध्ये श्रीमंत गौडा पाटील तर अथनीत महेश कुमठहळळी यांना पोट निवडणूक लढवता येणार आहे.