उपनोंदणी कार्यालयातील ऑपरेटरची बदली केली तरी तेथील गोंधळ सुरूच आहे.कार्यालयात असलेले प्रिंटर एजंटांचे असल्याने त्यांनी आपल्या मर्जीतील ऑपरेटरची बदली झाल्याने तेथून हलवले.परिणामी प्रिंटर उप नोंदणी कार्यालयात नसल्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत कामकाज ठप्प झाले होते.
खरेदी ,विक्री करण्यासाठी आलेल्या जनतेत आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्यात जोरदार वादही झाला.उप नोंदणी अधिकाऱ्यांना देखील कामानिमित्त आलेल्या जनतेने चांगले धारेवर धरले.त्यामुळे उप नोंदणी कार्यालयात सगळा गोंधळ उडाला होता.कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची वेळ कामानिमित्त आलेल्या जनतेवर आली.
दरम्यान नवीन ऑपरेटरनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.दुपारी नंतर नवीन प्रिंटर आणून बसवण्यात आले होते.जुन्या ऑपरेटरची बदली झाल्यामुळे नवे ऑपरेटर कामावर रुजू झाले आहेत.त्यांना काही जणांकडून धमकवण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे.जुने ऑपरेटर ,एजंट आणि कर्मचारी यांचे संगनमत होते.त्यामुळे काही एजंट बिथरले आहेत.उप नोंदणी कार्यालयात जागेची समस्या असल्याने तेथील दुसरी जागा देखील आमदारांनी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
बदली करण्यात आलेले ऑपरेटर पुन्हा उप नोंदणी कार्यालयात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.भ्रष्ट कारभार,बेजबाबदारपणा यामुळे उप नोंदणी कार्यालय चर्चेत राहिले आहे.