आपल्या भारतीय संविधानाने सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका करण्याचा त्यांच्या चुका दाखवून देण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे कोणत्याही माध्यमातून आपण संबंधित व्यक्तींवर टीका करू शकतो मात्र टीका करताना संविधानिक भाषेचा वापर न करता चुकीची भाषा वापरली तर त्याला कारवाईचा सामना करावा लागत असल्याचे बेळगावच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.येथील एका व्यक्तीस सीईएन पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई केली किरण पालकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे माजी नगरसेवक भैरगौडा पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून पालकर यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पालकर यांनी एका सोशल माध्यमाने लिहिलेल्या स्मार्ट सिटी संदर्भातील बातमी वर टीका करताना असंविधानिक भाषेचा वापर आणि शिव्या वापरल्या होत्या. याला गुन्हा म्हणून संबोधित करून एफ आय आर करण्यात आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्मार्ट सिटीचे अधिकारी असोत किंवा तक्रारदार माजी नगरसेवक असोत यांनी या पोस्टचा मागोवा घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले .तेच प्रयत्न उखडलेले रस्ते आणि विकासाच्या बाबतीत सुरू असलेली बोंबाबोंब दूर करण्यासाठी केले असते तर जास्त चांगले झाले असते अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
पालकर यांनी केलेली टीका योग्य होती मात्र ती टीका करताना वापरलेली भाषा चुकीची असल्यामुळे या कारवाईचा सामना करावा लागला. पण अशी कारवाई होत आहे म्हणून टीका करणे थांबवण्याची गरज नाही. कारण टीका करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असताना आपण टीका करण्याच्या बाबतीत घाबरून कोणताही निर्णय न घेता टीका करताना आपली भाषा योग्य असावी याचा मात्र विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.
सध्या कारवाईचा बडगा उगारून टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .मात्र टीकाकारांनी पत्रकारांनी प्रसिद्धीमाध्यमांनी तसेच वेबसाईट व सोशल मीडियावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने टीका करावी ती केल्याने प्रशासन व राजकीय व्यक्तींचे काम सुधारू शकते मतदान करून निवडून दिलेल्या राजकीय व्यक्तींनी योग्य काम करावे असे वाटत असल्यास त्यांच्या कामावर ती टीका करणे हेच योग्य उत्तर आहे मात्र त्यांचा सन्मान आणि माणूस म्हणून असलेल्या जगण्याचा अधिकार याचा विचार करून असंविधानिक भाषेचा वापर न करण्याची आहे.