भात कापणी करायला शेतात गेलेल्या महिलेला सर्प दंश झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.लता परशराम चौगुले वय 55 रा.कडोली बेळगाव असे या महिलेचे नाव आहे.
सोमवारी लता या भात कापणीसाठी गेल्या होत्या त्यावेळी विषारी नाग सापाने त्यांना दंश केला होता लागलीच उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गुरुवारी दुपारी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
काकती पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शेतातील पाणी कमी झाल्याने भात कापणीच्या साप बाहेर येत असतात.मयत लता यांच्या पश्चयात पती दोन चिरंजीव,विवाहित मुलगी असा परिवार आहे.