Monday, November 18, 2024

/

जीवघेण्या मंडोळी रोडवरील स्मार्ट सिटीचा बळी

 belgaum

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटी झाल्यानंतर येथील कामांना गती देण्याएवजी संथ गतीने सुरू करण्यात धन्यता मानणाऱ्या कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाचा फटका वारंवार नागरिकांना बसू लागला आहे. मंडोळी रोड येथील अर्धवट कामामुळे अयोध्यानगर येथील एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारांच्या विरोधातच तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दौलत दवले गवळी वय 55 राहणार अयोध्यानगर असे त्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. तो बेळगाव शहरातील प्रकाश थिएटर मध्ये काम करतो. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपले काम संपवून तो घरी परतत होता. यावेळी रस्त्यावरून जात असताना सायकल करून तो स्मार्ट सिटीचे काम सुरु असलेल्या खड्ड्यात पडला. त्याच्या पोटात बार घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Smart city work

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंडोळी रस्त्याचे काम सुरू करण्यात आली आहे. मात्र हे काम मागील अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आल्याने काही लोखंडे सळी बाहेर उघड्यावर आहेत. दौलत हे रात्री दहाच्या सुमारास तिथून येत असताना सायकल वरून कोसळले. यावेळी बार उघड्यावर असल्याने त्यांच्या पोटात या सळी गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.

Doulat davle gavali

शुक्रवारी रात्री आपले काम संपवून दौलत हे घरी परतत होते. शुक्रवारी रात्री दहानंतर ही घटना घडली असली तरी पहाटेपर्यंत याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस व प्रशासन राज्योतिसात दंग असल्याने याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्त्याचे काम सुरु झाले असले तरी ते अर्धवट स्थितीत असल्याने याचा फटका अनेकांना बसत आहे. मंडोळी रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या कामचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनास्थळी नगरसेवक पंढरी परब यांच्यासह इतर नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्मार्ट सिटीचा आंधळा कारभार कधी दूर होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

माजीं नगरसेवक पंढरी परब यांनी मयत कुटुंबियांच्या नातलगांना भेटून सांत्वन केल.या मृत्यू मुळे स्मार्ट कामाला कायमचा कलंक लागला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.