टिळकवाडीत असलेल्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे स्थलांतर अशोकनगर येथील बुडा कार्यालयात होणार आहे.सध्या टिळकवाडीत स्मार्ट सिटी आणि स्मार्ट सिटी कन्सल्टन्सी कार्यालये महानगरपालिकेच्या इमारतीत आहेत.
स्मार्ट सिटी कन्सल्टन्सी कार्यालय हे टिळकवाडीच्या महानगरपालिकेच्या इमारतीतच राहणार आहे पण स्मार्ट सिटी कार्यालय मात्र अशोकानागर येथील बुडाच्या कार्यालयात स्थलांतर होणार आहे.
प्रादेशिक आयुक्त आदित्य बिश्वास यांच्या सुचनेनंतर कार्यालय स्थलांतर कार्यवाही करण्यात आली आहे.