बेळगाव शहरातील रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत .आता बेळगाव शहरातील ट्राफिक सिग्नल ची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्या सहा ठिकाणी सिग्नल आहेत. आणखी 16 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल ची उभारणी करण्याचा विचार पुढे आला असून त्यासाठी तयारी सुरू आहे. ज्या 6 ठिकाणी सिग्नल आहेत त्यापैकी चन्नम्मा सर्कल येथे सर्वात जास्त आहेत. पुढील पाच वर्षात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करून आणखी सिग्नल असावेत असा विचार पोलिस विभागाने केला. त्याचा प्रस्ताव बेळगाव पोलिस आयुक्तांकडे दिल्यानंतर आणखी 16 ठिकाणी सिग्नल बसवण्याचा विचार पुढे आला आहे.
नवीन व्यवस्था बसवताना त्याबरोबर स्वतंत्र कॅमेरे, ऑटोमॅटिक सिग्नल लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्या व्यवस्थेतून रहदारीचे नियम मोडणाऱ्यांना कारवाई करण्याची व्यवस्थाही होणार आहे .त्यामुळे यापुढील काळात शहरातील रहदारी चांगली होण्याच्या बाबतीत प्रयत्न होणार असे वाटत आहे.