शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्यांच्या जवळील रोख रक्कम जप्त करत सात जुगाऱ्याना अटक केली आहे
मारुती गल्ली खासबाग येथे सार्वजनिक ठिकाणी अंदर बहार जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून 58660 रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त केले व सात जुगाऱ्याना अटक केली आहे.मंगळवारी मध्यरात्री नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश दुर्गाL9प्पा गोल्हर (रा. भारतनगर, पहिला क्रॉस), बाबु रामू साखे, आनंद गंगाधर बेंगळुरी, नारायण फकिरा कांबळे (तिघेही रा. पी. के. क्वॉर्टर्स), प्रशांत नारायण वाघुकर, मंजुनाथ अशोक पाश्चापुरे (दोघेही रा. बसवाण गल्ली, बेळगाव), संतोष शिवाप्पा जंतीकट्टी (रा. मारुती गल्ली, खासबाग) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.
इ