अपात्र उमेदवार यांचा निकाल लागल्यानंतर पोट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अपात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मान्यता न्यायालयाने दिल्यामुळे आता निवडणुकीची तयारी सुरू आहे.
अथणी मतदारसंघातून महेश कुमठळी यांना भेट विधानपरिषदेची जागा देण्याची चर्चा सुरू आहे.
त्या जागी उपमुख्यमंत्रीपद भोगत असलेले लक्ष्मण सवदी निवडणूक लढवून आपले आमदार होण्याचे स्वप्न पुर्ण करणार आहेत.

उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्यानंतर लवकरात लवकर एखाद्या ठिकाणी निवडून येणे गरजेचे असते आणि मतदारसंघातील लक्ष्मण सवदी यांना तिकीट देऊन पोटनिवडणुकीत यांचा विजय निश्चित केला जाणार आहे.
तर अपात्र ठरलेल्या आमदार महेश यांना पुन्हा निवडणूक लढायला न देता थेट विधान परिषदेत जागा देण्याची कबुली दिल्याची चर्चा सुरू आहे . या दोघांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे.