भेटी लागे जीवा या ओढीने आतुरता आणि आनंदी वातावरणात निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील 5 भाविक अपघातात ठार झाले आहेत त्यामुळे मंडोळी गावावर शोककळा पसरली असून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघाती निधन हा अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.
कृष्णा वामन कणबरकर वय 45, महादेव मल्लप्पा कणबरकर वय 47, बाळू टेलर आंबेवाडीकर वय 52,अरुण मुतगेकर वय 38 (सर्व रा.मंडोळी),हंगरगा यल्लप्पा देवप्पा पाटील वय45, अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत हे भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले होते मात्र चांगल्या जवळ त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला होता.सकाळी सांगोला पोलिसांनी पंचनामा करून मयतांचे पार्थिव बेळगावकडे पाठवले जाणार आहेत.अपघाताची माहिती कळताच मंडोळी ग्राम पंचायतीचे सदस्य अनेकांनी पंढरपूर गाठले आहे.अपघात होताच जखमी मयताना पंढरपूर इस्पितळात दाखल करण्यात आले होते.शुक्रवारी सायंकाळी नंतर मंडोळीत मयतांवर अंतिम संस्कार होणार आहेत.
कार्तिकी एकादशीनिमित्त बेळगाव शहर आणि परिसरातून हजारो भाविक विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला रवाना होत असतात. दरवर्षी ही भाविक जात असतात. आषाढी वारी चुकली कार्तिकी वारीला हमखास विठ्ठलाची आणि रखुमाईची त्यांना लागत असते. टाळ-मृदुंगाच्या आवाजात हे भाविक जात असतात. मंडोळी येथील भाविक ही त्याच जोडीने निघाले होते. मात्र नियतीचा खेळ पलटला आणि त्यांच्यावर काळाने झडप घातली.
घरा मधून निघताना मोठी आस घेऊन विठ्ठलाची दर्शन होईल, आपण सुखरूप परत येइन, विठ्ठलाची कृपा कायम आपल्यासोबत आणि आपल्या कुटुंबियांवर राहील. त्यांची ही आशा अर्धवटच राहिली आहे. हंगरगा आणि मंडोळी गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला आहे.