अपघात होऊ नये म्हणून अशा प्रकारे झाडाच्या फांद्या व पोती भरून खड्डयां भोवती लावण्यात आल्या आहेत. पण रात्रीच्या वाहन चालकांना दिसत नाही आहे ही अवस्था बनली आहे बेळगावातील ए पी एम सी रोडची…
या रोडवरून अवजड वाहने ए पी म सी कडे मोठ्या प्रमाणात जात असतात प्रशासन एकाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत .
हाच खड्डा काही दिवसापूर्वी ज्योतीनगर मधील नागनाथ युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बुजवला होता पण मोठ्या प्रमाणात रोज होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि पाऊस यामुळे परत हा खड्डा मोठा तयार झालाय …प्रशासनानं लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाढली आहे.