गोवावेस जवळील हेस्कोम च्या सेक्शन ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बाहेर चप्पल काढून या असा दंडक लावणाऱ्या अधिकाऱ्यांना महागात पडले आहे . एका वकिलाने कार्यालयात बाहेर चप्पल काढून येण्याचा कुठला कायदा असेल तर सांगा असे विचारल्यानंतर अधिकार्यांना काहीच बोलता आले नाही.
गोव्यावेस मध्ये हेस्कोमचे कार्यालय आहे, या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांची कायम वर्दळ असते, अधिकारी स्वतः बूट घालून कार्यालयात फिरत असतात, मात्र नागरिकांना दरवाजात बाहेर चप्पल काढून आल्याशिवाय आत घेतले जात नाही ,यामुळे नागरिक बाहेर चप्पल काढून जातात.
आज काही कामानिमित्त ॲडव्होकेट हर्षवर्धन पाटील त्या कार्यालयात गेले होते. त्यांनाही चप्पल बाहेर काढून या असे सांगण्यात आले. त्यांनी विचारले की याचा कायदा असला तर दाखवा .मंदिर किंवा प्रार्थना स्थळी किंवा पोलीस स्थानकात चप्पल घालून जाऊ नये असा नियम लोक श्रद्धा भावनेतून तो पाळतात.
या कार्यालयात चप्पल घालून जाऊ नये असा नियम कोठेही पहायला मिळाला नाही, अधिकाऱ्यांनी हा नियम कुठून काढला असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी विचारला त्यावेळी आम्ही कायदा दाखवू शकत नाही, हा कायदा आम्ही तयार केला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले ,तुम्ही तयार केलेला कायदा पाळण्याची आपल्याला गरज नाही, असे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी चप्पल घालूनच कार्यालयात प्रवेश केला आणि नागरिकांना आवाहन केले की यापुढे कोणीही याठिकाणी बाहेर चप्पल काढून ठेवू नये.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करावी सामान्य नागरिकांना चप्पल बाहेर ठेवायला लावणारे अधिकारी कोणता हुकुमशाही नियम लावत आहेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.