राज्योत्सव मिरवणुकीतील पताके लावताना एका कन्नड भाषिक कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.गुरुवारी रात्री बस्ती गल्ली हलगा येथे ही घटना घडली आहे.
आकाश पाटील वय 23वर्षे रा.बस्ती गल्ली हलगा असे या करंट लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.या बाबत समजलेल्या माहितीनुसार राज्योत्सव तयारी साठी लाल पिवळे पताका लावत होता त्यावेळी विद्युत भारित तारेला त्याचा स्पर्श झाला त्यावेळी शॉक लागला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 11:30 ही घटना घडली आहे.
लाल पिवळे पताके सर्वत्र लावले जात आहेत राज्योत्सव मिरवणुकीत सगळी कडे लाल पिवळे लावले जात आहेत या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.