राज्यातील पोट निवडणूक जाहीर झाल्यावर जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे.बेळगाव जिल्हा हा आगामी पोट निवडणुकीच्या निमित्ताने महत्वपूर्ण ठरणार आहे.जिल्हयातील राजकारण ढवळून निघणार असून या पोट निवडणुकीचे राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
अनेक नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते काँग्रेसशी संधान बांधून आहेत.कागवाडचे राजू कागे हे देखील भाजपच्या नाराज नेत्यांपैकी एक आहेत.राजू कागे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बंगलोर येथे भेट घेऊन चर्चा केली आहे.
या भेटीच्यावेळी सिद्धरामय्या यांचे विश्वासू रामदुर्गाचे माजी आमदार अशोक पट्टण उपस्थित होते.या भेटीमुळे अनेक तर्कवितर्काना उत आला आहे.