प्यास फाउंडेशनतर्फे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या भावीहाळ तळ्याचे ग्राम पंचायतीकडे हस्तांतरण के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांच्या हस्ते अल्लामप्रभु स्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आपल्या भाषणात कोरे यांनी प्यास फाउंडेशनच्या कार्याचे आपल्या भाषणात कौतुक केले.पाण्याचे योग्य व्यवस्थापन भविष्यासाठी करा.पुनरुज्जीवित केलेलं तळे स्वच्छ ठेवा असेही सांगितले.
अल्लामप्रभु स्वामीजींनी आपल्या भाषणात प्यास फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही प्यासने आपले कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगितले.
डॉ माधव प्रभू यांनी प्यास फाऊंडेशनने पुनरुज्जीवित केलेल्या तळ्याची माहिती दिली.डॉ प्रीती कोरे आणि अभिमन्यू डागा यांचा ग्राम पंचयातीतर्फे सत्कार करण्यात आला.पाच एकर जागेतील तळ्यामुळे सोळा हजार जनतेची आणि दोन हजार जनावरांची पाण्याची सोय झाली आहे.
आपले वडील डॉ राजेंद्र प्रकाश यांच्या स्मरणार्थ विवेक प्रकाश यांनी या तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक सहायय केले आहे.यावेळी प्यास फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.