अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याची बैठक जिल्हा पंचायतीच्या सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी कायदा सुव्यवस्था स्थिती हाताळण्यासाठी पोलिस खाते सज्ज असल्याचे सांगितले.
आपल्या देशाची सुंदरता बाबरी मशीद,लाल किल्ला,राम मंदिर,ताजमहल यामध्ये नसून ती हिंदू मुस्लिम ऐक्यात असल्याचे मत बैठकीला उपस्थित धार्मिक नेते,सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केले.सगळ्यांनी शांतता बाळगून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन आणि पोलीस खात्याला सहकार्य करावे असे आवाहनही बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आले.
अयोध्या प्रश्न अनेक नागरिकांच्या संवेदना जोडले गेले आहेत त्यामुळे कोणीही चुकीच्या पद्धतीची विधाने करून एकमेकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले पोलीस खात्यातर्फे सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्या प्रकारचा अनुचित कामे करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवर बैठक घेऊन एक वेगळ्या पद्धतीने नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचा इशारा दिला आहे