कर्नाटकात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी ते गांभीर्याने घेतले जात नव्हते .पण आता मात्र महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीची कडक मोहीम अधिक तीव्र करण्याचे ठरवले आहे.कर्नाटकात प्लास्टिक निर्मिती,विक्री आणि बाळगण्यावर बंदी घालण्यात आली आहे.काही दिवस महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली होती पण नंतर मोहीम थंडावली होती.
आता दुकानात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर,विक्री करणाऱ्यांवर,साठा करणाऱ्यांवर महानगरपालिका कडक कारवाई करणार आहे.प्लास्टिक आढळल्यास प्लास्टिक जप्त करून दंड ठोठावला जाणार आहे.याशिवाय त्या दुकानांचा परवाना रद्द केला जाणार आहे.
प्लास्टिक कॅरी बॅगमधून सामान घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे आता बाजारात जाताना प्रत्येकाने कापडी पिशवी बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे.कॅरी बॅग वापराल तर दंड भरावा लागेल हे आता बेळगावकारांनी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.