जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली असून तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने एक लिस्ट बाहेर पडली असून यामध्ये 16 ग्राम विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अजूनही ही मोहीम सुरूच राहणार असून या मोहिमेत आणखी ग्रामविकास अधिकाऱ्यांचा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
मागील आठवडाभरापासून तालुक्यातील ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या मोहिमेला जोरात सुरुवात केली असून या मोहिमेत भ्रष्टाचार पीडीओना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे. या कारभारामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून ग्रामविकास अधिकाऱ्यांना मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या तालुक्यात एकूण 18 ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निघाला असला तरी यामध्ये दोघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना अभय देण्यात आल्याचेही समजते. त्यामुळे सध्यातरी 16 ग्राम विकास अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एकदाच करण्यात आल्याने अनेकांची पंचाईत झाली असून उर्वरित ग्रामपंचायतचा पदभार संबंधित नजीकच असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे एकच खळबळ माजली आहे.