महानगरपालिका,प्रशासन निष्क्रिय ठरल्यामुळे ,अधिकारी बेजबाबदार असल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला आहे.
बोगारावेस संचयनी सर्कल येथील अत्यंत धोकादायक ठरलेले खड्डे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी बुजवले. हे खड्डे पेवर्स,खडी व चिपिंग घालून भरण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती रहदारीच्या ठिकाणी असलेले हे धोकादायक खड्डे लहान मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरले होते..हे खड्डे भरण्यासाठी कॅन्टोन्मेंट मराठी शाळेचे मुख्याध्यापक व जीवनविद्या मिशन, बेळगाव शाखेचे सचिव पि.एस.बिर्जे,फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, शाबोद्दिन बोंबेवाले,अमिरखान पठाण, सय्यद बेपारी,
बशीरअहमद शेख,असिफ अंकलगी,शाहिद शेख,शहानवाज खान यांनी सहकार्य केले.यासाठी दक्षिण ट्रॅफिक पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्रीनिवास हंडा यांचे सहकार्य लाभले.
बेळगाव शहरात रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की रस्तेच अपघात मय बनले आहेत इतकेच कायतर स्मार्ट सिटी कामाच्या हलगर्जी पणा मुळे एकाचा बळी देखील गेला होता त्यामुळे अनेक सामाजिक धार्मिक संस्था खड्डे बुजवण्यासाठी पुढे येत आहेत.