Wednesday, January 22, 2025

/

अपघाताने चार मुलांचे आईचे छत्र हरपले

 belgaum

उताराला निष्काळजीपणे पार्क केलेला मॅक्सि कॅब टेम्पो महिलेच्या अंगावर पलटी झाल्याने महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.अपघातात महिला मृत्युमुखी पडल्यामुळे चार मुलांच्या डोक्यावरचे आईचे प्रेमाचे छत्र हरपले आहे.

हा दुर्दैवी अपघात बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात घडली आहे.रेणुका बसवाणी घसारी वय 34 रा.सिद्धेश्वर नगर मुचंडी असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मुतगा मुचंडी मार्गावर हा अपघात झाला.

Renuka ghasari
अपघात मयत महिला रेणुका घसारी फोटो

मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका भात कापणी करण्यासाठी त्याच मॅक्सि कॅब मधून शेतात गेल्या होत्या.मॅक्सि कॅब चालक उतरतीला गाडी थांबवून खाली उतरला होता. त्यावेळी मागील बाजूने गाडीतून उतरून घरी जात असताना टेम्पो रेणुका यांच्यावर पलटी झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.लागलीच त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करतांना त्याचा मृत्यू झाला. मारिहाळ पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रेणुका या आपल्या गावातील महिला सोबत त्याच मॅक्सि कॅब मधून भात कापणी करायला गेल्या होत्या गाडीतून उतरूत असतेवेळी काळाने त्यांच्यावर झडप घातली व त्यात त्यांचा अंत झाला आहे. मयत रेणुका यांचे पती बसवानी हे भाजी मार्केट मध्ये काम करतात तर त्यांना दोन मुले दोन मुली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.