जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या उचगाव येथील जवान राहुल भैरू सुळगेकर यांचे पार्थिव आज वायुसेनेच्या विशेष विमानाने बेळगावला दुपारी सव्वा एक वाजता पोहोचले.
पूँछ (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राहुल याना वीरमरण आले. जम्मू, दिल्ली, बंगळूर मार्गे लष्कराच्या विशेष विमानाने पार्थिव उचगावला नेण्यात आले. विमानात राहुलच्य पार्थिवासोबत त्याचा भाऊ मयूर होता.
विमानतळावर पार्थिव दाखल होताच लष्करी जवानांनी मानवंदना दिली. ब्रिगेडियर गोविंद कलवड, जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी,आमदार अनिल बेनके,आमदार अभय पाटील, पोलीस आयुक्त लोकेश कुमार, Dcp सीमा लटकर, तहसीलदार मंजुळा नाईक, विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य, वायुसेना जवान, सांबरा रक्षक माजी सैनिक संघटना, मुतगा माजी सैनिक संघटना आदींनी श्रध्दांजली वाहिली.
यावेळी पंधरा मिनिटं हुन अधिक काळ विमान तळ स्तब्ध झाले होते कर्मचारी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते युवकांनी देखील वीर जवानाला मानवंदना दिली.