अवकाळी पावसामुळे शहराच्या मधून वाहणारा लेंडी नाला फुटल्याने शेकडो एकर जमिनीतील भात पिकाचे नुकसान झाले आहे.रुपाली सिनेमा शेजारून वाहणारा फुटलेला नाला दुरुस्त करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतल आहे.
बेळगाव शहरातील शेत वाडीत एका ठिकाणी 60फूट असा हलगा बळळारी नाल्या पर्यंत लेंडी नाला अनेक ठिकाणी फुटला आहे. पुढील संकट टाळण्यासाठी या नाल्यात भराव माती टाकण्याची गरज ओळखून शेतकऱ्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लोक वर्गणीतून नाला दुरुस्ती सुरू केली आहे.शासकीय निधीची वाट न बघता नाल्यात भराव माती टाकली जात आहे.ए पी एम सी सदस्य तानाजी पाटील यांनी 50 ट्रक माती तर आमदार अनिल बेनके यांनी जे सी बी देऊन शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. या कामासाठी शेतकऱ्यांनी लोक वर्गणी देखील काढली आहे.
रुपाली सिनेमा शेजारून वाहणारा नाला फुटल्याने शेकडो एकर जमिनीतील भात पीक धोक्यात आहे पुढील वर्षीचे नुकसान टाळण्यासाठी बळी राजनेच पुढाकार घेतला आहे. माती टाकून बांध घालण्याचे काम शेतकरी करत आहेत.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत,सुनील जाधव आदींनी या कामी शेतकऱ्यांना मदत केली आहे