बेळगाव शहर सायबर गुन्हे आणि अमली पदार्थ(सी ई एन) पोलिसांनी विनायक नगर भागात धाड टाकून बेकायदेशीर रित्या विक्री केली जाणारी साडे चार लाखांची दारू व रोख रक्कम जप्त करत एकास अटक केली आहे.
राजीव केशव नायडू वय 37रा. कुमारस्वामी ले आऊट बेळगाव यास अटक करून त्याच्या जवळील 4690 रुपये रोख रक्कम 750 मिली विविध प्रकारच्या 441 बॉटल जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात विनायक नगर येथील अर्पण अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅट मध्ये राजीव याने गोवा बनावटीची दारू साठवून ठेवली होती. ब्लेंडर सप्राईड,रॉयल स्टेग,रॉयल चॅलेंज,वोडका, मॅजिक मोमेंट आदी प्रकाराच्या दारुची साठवणूक केली होती.
सीई एन पोलीस स्थानकाचे निरीक्षक यु एच सातेनहळळी यांनी सहकाऱ्यांसह धाड टाकून इतक्या मोठ्या प्रमाणात अधिक किंमतीवर विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेली दारू जप्त केली.