गोकाक मतदार संघातील गणित कोणालाही समजत नाही.हे गणित केवळ जारकीहोळी भावंडाना माहीत आहे.नवीन व्यक्तीला हे समजण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल असे लखन जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मी गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे.पाचवेळा रमेश जारकीहोळी यांना निवडून आणले आहे.आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघाचा दौरा केला आहे.
उरलेल्या दिवसात देखील मतदारसंघ पिंजून काढणार आहे.शुक्रवारी किंवा शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असेही गोककमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार लखन जारकीहोळी यांनी सांगितले.
येडीयुरप्पा सरकार तीन वर्षे बळकट
बी एस येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आणखी तीन वर्षे टिकेल ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे मी स्वागत करतो यानंतर सरकार बळकट झाले आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्या नंतर माध्यमाना ते प्रतिक्रिया देत होते.पोट निवडणुकीत मी भाजप कडून निवडणूक लढवणार आहे.मोदी शाह यांच्या नेतृत्वात कर्नाटक सरकारला बळकटी मिळाली आहे.