किल्ल्या जवळील भाजी मार्केटमधून एपीएमसी मार्केटमध्ये स्थलांतर केलेल्या भाजी व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एपीएमसी कार्यालया समोर धरणे धरले.नंतर एपीएमसी सेक्रेटरीला चांगले धारेवर धरून आश्वासन पूर्तता होत नसल्याबद्दल खडे बोल देखील सुनावले.स्थलांतर करा ,दुकाने बांधून देतो म्हणून आश्वासन दिलेला त्याची पूर्तता कधी होणार?आमचे आर्थिक नुकसान अव्वाच्यासव्वा भाडे भरून होत आहे,त्याला जबाबदार कोण असे विचारून व्यापाऱ्यांनी सेक्रेटरीची भंबेरी उडवली.अखेर थातुरमातुर आश्वासन देऊन सेक्रेटरी निवेदन घेऊन निघून गेले.
बळजबरीने एपीएमसी मध्ये स्थलांतर करायला लावलेल्या भाजी व्यापाऱ्यांची अवस्था आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशीच झाली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.कारण एपीएमसी मध्ये स्थलांतर केल्यावर लगेच भाजी व्यापाऱ्यांना दुकाने बांधून देण्यात येतील आणि अन्य सुविधा पुरविण्यात येतील असे तोंड भरून आश्वासन एपीएमसी आणि लोकप्रतिनिधींनी दिले होते.पण कसचे काय सहा महिने झाले तरी भाजी व्यापाऱ्यांना स्वतंत्र दुकाने देण्यासंबंधी कोणतीही हालचाल नाही.सध्या भाजी व्यापारी दुसऱ्याच्या दुकानात भाड्याने असून अव्वाच्यासव्वा भाडे भाजी व्यापाऱ्यांना द्यावे लागत आहे.
दुकान मालकांनी दुकाने भाड्याने देऊन भरमसाठ भाडे आकारणी सुरू केली आहे.विशेष म्हणजे भाड्याची पावती देखील दिली जात नाही.
त्वरित आम्हाला दुकाने बांधून द्यावीत अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा असा इशारा भाजी व्यापाऱ्यांनी एपीएमसीला दिला आहे.
आणखी किती जीव घेणार?
मार्केट किल्लाहून ए पी एम सी स्थलांतरित केल्याने पाच बळी गेलेत आणखी किती घेणार?असा प्रश्न भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी उपस्थित केला.
सिकंदर अगसगी,मेहबूब हंचीनमनी हे व्यापारी
इम्रान दलायत व राजू पेडणेकर हे बारदान व्यापारी महादेव घसारी अश्या पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.भाजी मार्केट किल्ला हुन ए पी एम सी स्थलांतराचे हे बळी आहेत याला कोण जबाबदार असा प्रश्न देखील दपाटील यांनी उपस्थित केला. ए पी एम सी सेक्रेटरीना निवेदन देण्यात आले त्यावेळी अनेक व्यापारी सहा महिने उलटले तरी नविन गाळे मिळाले नसल्याचा आरोप करत संतप्त होत होते