बंगलोर पोलीस तपास करत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातून नित्यनवी माहिती उजेडात येत असल्याने अनेलांची झोप उडाली आहे.
राघवेंद्र नामक व्यक्ती या हनी ट्रॅप प्रकरणाची सूत्रधार असून त्याच्या जबानीतून धक्कादायक माहिती बाहेर पडली आहे.उत्तर कर्नाटकातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार देखील हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याची माहिती बाहेर आल्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि राजकारणी हनी ट्रॅप मध्ये गुंतले असून काहींचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2015 पासून राघवेंद्र उर्फ राजी याच्या गॅंगने अनेक पक्षाच्या आमदारांना ब्लॅकमेल केल्याचे बंगलोर पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
वेगवेगळ्या पक्षाचे विसहून अधिक आमदार,अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती उपलब्ध झाले.ब्लॅकमेल करून बरीच माया या टोळीने जमवली असून हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे राज्यातील अनेक प्रभावशाली व्यक्तीची झोप उडाली आहे.